शीतलने असं का केलं ?    वेळ सायंकाळची. एका ठिकाणी व्याखानांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून मी विद्यापीठात परतत होते. बराच वेळ कार्यक्रम सुरु राहिल्यामुळे मोबाईल पाहता आला नाही. बसमध्ये बसल्यानंतर पर्समधून मोबाईल काढला आणि पाहू लागले. पाहता पाहता व्हॉटसअपवर एक पोस्ट नजरेस पडली आणि काळजात धस्स झालं. ज्या वरळीच्या (मुंबईतील) ‘संत मीराबाई शासकीय वसतिगृहा’तील रूम नंबर ७४ मध्ये दोन वर्षं वास्तव्य करून मी ‘मास्टर ऑफ सोशल वर्क’ पूर्ण केलं, त्या रूमच्या खालच्या मजल्यावर असलेल्या रूममध्ये एका मुलीने गळफास घेऊन स्वतःची जीवनयात्रा संपवली. त्या घटनेची ती पोस्ट होती. या पोस्टने मी हादरले आणि क्षणभरात अवघं ‘संत मीराबाई वसतीगृह’ माझ्या डोळ्यासमोर उभं राहिलं. का आत्महत्या केली असावी? नेमकं काय झाले असावं? असं कोणतं ‘मेजर’ अथवा ‘डेंजर’ कारण असावं, की ज्यामुळे तिच्यावर अशी वेळ यावी? या प्रश्नांचं काहूर माझ्या मनात थैमान घालू लागलं. व्हॉट्सअपवरील इतर ग्रुपवर या घटनेबाबत थोडीफार माहिती येत होती, पण नेमकं कारण समजत नव्हतं. त्यामुळे मनाची अस्वस्थता अधिक तीव्र होत होती. म्हणून मी स्वतःच संत मीराबाई वसतिगृहातील माझी मैत्रीण श्रद्धाला फोन केला आणि तिने एकूण घटना ऐकवली. जिने आत्महत्या केली, तिचं नांव शीतल. दिसायला सुंदर. विशेष म्हणजे, ती इंजिनिअरिंग करत होती. कोणत्यातरी विषयात मार्क कमी पडले आणि तिला ड्रॉप लागला. ड्रॉपच्या धक्क्यातून तिला सावरता आलं नाही, म्हणून तिने थेट आयुष्यालाच पूर्णविराम दिला. 
    खरंतर, शीतलचं असं अचानक जाणं कोणालाही चटका लावणारं आहे. शीतल गेली, पण, तिने जाताजाता शिक्षणव्यवस्थेपुढे एक भलं मोठं प्रश्नचिन्ह उभं केलं आहे, हे नाकारून चालणार नाही. ड्रॉप लागल्यामुळे आपलं करिअर नेस्तनाबूत होणार या अस्वस्थतेने तिला घेरलं. त्यातून बाहेर पडता येईल असा सहज सुलभ मार्ग आपल्या शिक्षणव्यवस्थेमध्ये उपलब्ध नाही. त्यामुळे, तिच्याजवळ दुसरा पर्याय नसावा. रिझल्ट पूर्णपणे निगेटिव्ह आल्यानंतर कमी अवधीत फेरपरीक्षा घेऊन विद्यार्थ्याचं वर्षं वाया जाणार नाही याची तजवीज प्रचलित शिक्षणव्यवस्थेत दिसत नाही. या त्रुटीचा फटका शीतलला बसला असं म्हटलं तर ते अयोग्य ठरणार नाही. शिक्षणव्यवस्थेत काही उणीवा जरूर आहेत, हे खरं असलं तरी विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टिकोनातूनच मार्ग काढायला हवा. शीतलने तसा प्रयत्न केला असता तर तिला हकनाक जीव गमवावा लागला नसता, हेही खरं! शीतलला मी पाहिलेलं नाही. दुरान्वये कसलाही संबध आला नाही. 
    असिफासारख्या निरपराध अल्पवयीन चिमुरडीवरील झालेल्या अत्याचाराची देशभर चर्चा सुरु असतानाच शीतलची हृदयद्रावक घटना समोर आली. शिक्षणव्यवस्थेला दोष देत शीतलने न्यायासाठी शिक्षण मंत्रालयासमोर आंदोलन छेडलं असतं किवा मंत्रालयाच्या परिसरात स्वतःला संपवून घेतलं असतं, तर आज शिक्षणव्यवस्थेबाबत प्रचंड गदारोळ झाला असता. विविध संस्था, संघटना, पक्षांनी आणि चळवळीतील मुलांनी, विद्यार्थ्यांनी मंत्रालयावर एव्हाना मोर्चे काढले असते. पण असो, असं काही घडलं नाही. एकमात्र नक्की, मुलींच्यावर असलेलं शैक्षणिक दडपण, ताण आणि विद्यार्थीदशेतील करिअरची असुरक्षित चिंता ही परिस्थिती किती टोकदार व भयावह बनते आहे, हे शीतलच्या प्रकरणाने अधोरेखित झालंय. असिफाची घटना ही पूर्णतःवेगळी आहे. पण, या दोन्हीही घटनेतून या देशातील मुली आज सुरक्षित नाहीत, कोणत्या ना कोणत्या अन्यायाच्या, अत्याचाराच्या त्या शिकार ठरत आहेत, ज्या नराधमांनी पशुत्वाला लाजवेल अशा पद्धतीची विकृत कृती करून असिफाची शिकार केली आणि क्रौर्याची सीमा ओलांडली त्या नराधमांना कठोरातील कठोर कशी शिक्षा द्यायची, हे न्यायव्यवस्था ठरवेल. इथे मात्र, शीतलच्या प्रकरणात तिला कोण न्याय देणार किवा कोणाला जबाबदार धरणार, याबाबत सारंच अनुत्तरीत आहे. शैक्षणिक वातावरणच या अनुत्तरीत परीस्थितीला जन्माला घालतें आहे की काय, असंही वाटतं. कारण, आजच्या शिक्षणव्यवस्थेमध्ये मुलींना करिअर घडविण्याचा विनादडपण विश्वास मिळायला हवा; त्याचबरोबर मुलींचं मनोबल कसं वाढेल हे पाहायला हवं. परंतु, घडतंय मात्र उलटच! शिक्षणव्यवस्था दिवसेंदिवस मुर्दाड बनू पाहतेय. शिक्षणसंस्था म्हणजे कारखाने आणि विद्यार्थी म्हणजे कच्चा माल असंही एक नवं समीकरण भांडवली अर्थव्यवस्थेने उदयाला आणलं आहे. त्यामुळे मानवतेची भावना शैक्षणिक वर्तुळातूनच परागंदा झाली आहे की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांच्या भावनांशी खेळ खेळत आर्थिक शोषणापासून ते मानसिक त्रास देण्यापर्यंत ही शिक्षणव्यवस्था निगरगट्ट होताना दिसत असून याची प्रचिती पावलापावलाला येतही आहे. आज असंख्य मुली ग्रामीण भागातून शहराच्या ठिकाणी शिक्षणासाठी येत आहेत.  स्वतःचं करिअर घडवण्यासाठी नामांकित कॉलेजांमध्ये प्रवेशासाठी धडका मारताना दिसत आहेत. या मुलींची काय अवस्था होते किंवा कशी दमछाक होते हे सर्वश्रुत आहे. मेरीट आणि डोनेशनच्या स्पर्धेत आपण टिकाव धरू शकू का, या चिंतेने त्यांची मनं पोखरलेली आणि भेदरलेली असतात. अशाच पोखरलेल्या, भेदरलेल्या अवस्थेत या मुलींचा वसतिगृह मिळवण्याचा संघर्ष सुरु राहतो. मग कागदपत्रांची जुळवाजुळव करत मुलींना मंत्रालयापर्यंत विविध स्तरावर झगडा करावा लागतो आणि अ‍ॅडमिशन निश्चित करावं लागतं. या खडतर प्रवासातच खरं म्हणजे सर्व शक्ती पणाला लागते. यात यश आलं तर उरलीसुरली शक्ती आणि घरच्यांचं पाठबळ करिअरच्या पुढच्या प्रवासासाठी वापरावं लागते. मग प्लॅनिंग, अभ्यास, क्लास आणि टॉपर यासाठीचं द्वंद्व सुरु राहतं. त्यामध्ये महत्प्रयासाने टिकलात तर ठीक, नाहीतर करिअरची वाट; असा हा बिनखात्रीचा एकूण मामला होऊन बसला असून, याच जीवघेण्या परिस्थितीशी आज लाखो मुली सामना करत आहेत. जीवानिशी जाण्याच्या घटना त्यातूनच समोर येत आहेत.
    शिक्षणाने माणसाला जगायला शिकवलं पाहिजे, की मरायला? असलं कसलं दुर्लभ शिक्षण आजच्या तरुणाईच्या वाट्याला येत आहे, की ज्याचे परिणाम शीतलसारख्या मुलींना भोगावे लागत आहेत? वास्तविक शिक्षणाने लढायला आणि भिडायला शिकवलं पाहिजे. प्रत्येक बाका प्रसंग भावनेच्या नव्हे; तर बुद्धीच्या आधारे निभावून नेण्याचं सामर्थ्य शिक्षणाने दिलं पाहिजे. कुठल्याही मुलीला आपण जे काही शिकतो आहोत, ते जर आपल्याला समजत नसेल, तर मला हे समजत नाही असं शिक्षणव्यवस्थेला सांगण्याचं स्वातंत्र्यसुद्धा शिक्षणव्यवस्थेनेच दिलं पाहिजे. तुम्ही जे शिकवता, ते आम्हाला कळत नाही, हेही ठासून सांगण्याचा हक्क शिक्षणव्यवस्थेने पुरवला पाहिजे. याशिवाय गुण पद्धत काय असली पाहिजे? शिकवण्याची पद्धत कोणत्या स्वरुपात असायला हवी? अभ्यासक्रम कसा असायला पाहिजे आणि कोणत्या भाषांमध्ये तो शिकवला पाहिजे, यांचा विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या दृष्टिकोनातून शिक्षणव्यवस्थने विचार करायला हवा आणि मुलींच्या स्वातंत्र्याची, हक्काची व अधिकाराची जाणीव ठेवून शैक्षणिक वातावरणातील मुलींचं जगणं सुरक्षित, तणावमुक्त आणि भयमुक्त केलं पाहिजे. 
    महाराष्ट्राच्या सामाजिक क्रांतीचा पाया सावित्रीबाई फुले आणि ज्योतीराव फुले या दांपत्याने रचला. स्त्री शिक्षणाची अत्यंत मूलभूत आणि मूलगामी स्वरुपाची चळवळ याच महाराष्ट्रातल्या मातीमध्ये त्यांनी पेरली. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनीही स्त्री सक्षमीकरणाला जबरदस्त बळकटी दिली. स्त्री उन्नयनाचा हा जागर आपल्याला तेवत ठेवायचा असेल, तर मुलींचा बळी घेणारी शिक्षणव्यवस्था नष्ट करून मुलींना सन्मानपूर्वक जगवण्याची, किंबहुना तिला जगायला शिकवणारी शिक्षणव्यवस्था नव्याने अस्तित्वात आणावी लागेल. तरच मुलींचं अस्तित्व टिकेल आणि असं झालं तर खर्‍या अर्थाने शिक्षणाचा तो एकप्रकारे विजय ठरेल. केवळ विद्यापीठांच्या चकाचक टोलेजंग इमारती उभारून चालणार नाही, तर मुलींचे जीवन शैक्षणिकदृष्ट्या मानवतेच्या भावनेतून आपण किती उंचीवर घेऊन जात आहोत हे फार महत्वाचं आहे. शैक्षणिक वातावरणातील मुलींचं सर्व प्रकारचे शोषण रोखणं आणि थांबवणं हे शिक्षणव्यवस्थेचं पहिलं कर्तव्य असलं पाहिजे. त्यासाठी शिक्षणव्यवस्थेने आता सज्ज व्हायला हवं. तरच शीतलसारखे हकनाक जाणारे बळी आपण रोखू शकू.

~पूनम गायकवाड

Responses

yeezy boost 500

Thanks a lot for giving everyone an exceptionally special possiblity to read articles and blog posts from here. It's always very cool plus full of fun for me personally and my office peers to search your site no less than thrice every week to see the fresh guides you have got. Of course, I'm certainly amazed with the dazzling information you serve. Some two ideas in this post are rather the most effective we have had.

off-white

I together with my friends have been analyzing the best secrets and techniques located on the blog then all of a sudden got a horrible feeling I never thanked the site owner for them. Those women are already consequently very interested to learn them and have surely been taking advantage of these things. We appreciate you actually being indeed kind and also for finding this kind of excellent subject areas millions of individuals are really desirous to know about. Our own sincere apologies for not saying thanks to earlier.

michael kors

I intended to write you this very little observation in order to say thank you as before relating to the exceptional principles you have contributed here. This has been certainly tremendously generous of you to give unhampered precisely what numerous people might have distributed as an e book to help with making some profit on their own, notably given that you might have tried it if you ever considered necessary. The points also served as a fantastic way to fully grasp that some people have similar desire just as my very own to know much more with reference to this condition. Certainly there are numerous more enjoyable moments ahead for those who look into your blog post.

michael kors outlet store

I actually wanted to develop a small message to be able to appreciate you for some of the wonderful tips you are placing at this website. My considerable internet investigation has at the end been recognized with reasonable facts and strategies to share with my visitors. I 'd tell you that many of us readers actually are very lucky to live in a fine site with many perfect individuals with very beneficial guidelines. I feel quite privileged to have discovered your webpage and look forward to so many more excellent moments reading here. Thanks again for everything.

chrome hearts outlet

Needed to post you this little bit of note to help thank you the moment again for those fantastic thoughts you've documented in this case. It has been quite strangely open-handed with people like you to convey without restraint exactly what numerous people would've supplied as an e book in order to make some money on their own, chiefly considering that you might have tried it in case you desired. The good tips additionally worked to be a fantastic way to be aware that many people have the identical interest just like my own to know good deal more with regard to this issue. I'm certain there are many more pleasant opportunities in the future for individuals that scan through your blog post.

converse outlet store

I wanted to develop a note so as to say thanks to you for some of the great pointers you are giving at this site. My time-consuming internet investigation has at the end of the day been rewarded with reliable know-how to talk about with my neighbours. I would suppose that many of us readers are quite fortunate to exist in a fine website with so many outstanding people with helpful plans. I feel extremely blessed to have come across the web site and look forward to tons of more cool times reading here. Thanks a lot once again for a lot of things.

yeezy boost 350

I simply wished to thank you so much again. I am not sure the things that I could possibly have done in the absence of these tips and hints shown by you about such problem. This has been a very depressing situation in my circumstances, however , taking a look at your expert fashion you handled that made me to leap with gladness. I'm just happy for the service and then hope you really know what a powerful job you are providing training most people thru your web site. Most probably you've never encountered all of us.

pandora bracelet

I wish to express my thanks to you for rescuing me from this type of problem. After checking throughout the world wide web and meeting ways which are not beneficial, I thought my life was well over. Existing without the presence of approaches to the difficulties you have fixed as a result of your review is a critical case, as well as the ones which might have in a negative way affected my career if I hadn't come across your site. Your actual capability and kindness in touching all the pieces was very useful. I am not sure what I would've done if I hadn't discovered such a thing like this. I can also at this time look forward to my future. Thanks a lot very much for the professional and results-oriented guide. I will not think twice to refer your site to anyone who wants and needs guide on this problem.

adidas stan smith men

I really wanted to compose a small word so as to thank you for all of the nice points you are giving out on this website. My time-consuming internet research has at the end of the day been paid with reliable insight to go over with my contacts. I 'd assert that we site visitors are truly blessed to be in a superb network with many wonderful people with interesting suggestions. I feel extremely privileged to have encountered your site and look forward to so many more excellent moments reading here. Thanks a lot again for a lot of things.

air max 270

Thank you for every one of your labor on this blog. Debby take interest in setting aside time for internet research and it's obvious why. Most people notice all about the compelling tactic you offer advantageous ideas via this blog and as well cause participation from other ones about this subject plus our favorite simple princess is without question studying so much. Have fun with the rest of the new year. Your performing a brilliant job.

yeezy boost

I and also my guys have already been reading through the good techniques found on the blog and then immediately came up with an awful feeling I never expressed respect to the web site owner for those techniques. The guys were certainly excited to learn them and now have in actuality been enjoying these things. Appreciation for actually being simply considerate and then for figuring out these kinds of excellent subjects most people are really needing to understand about. My personal honest regret for not saying thanks to sooner.

jordan retro

I precisely needed to thank you very much yet again. I'm not certain the things I might have done without the entire thoughts shown by you about my theme. It previously was a real distressing issue in my circumstances, however , finding out your professional way you solved it took me to leap with joy. Now i'm thankful for the guidance as well as hope you comprehend what an amazing job your are getting into instructing the others via your blog. More than likely you have never come across any of us.

Leave your comment