'बेटी बचाव, बेटी पाढव'च्या बाता...    महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक चळवळींमध्ये स्त्री-पुरुष समानता, स्त्रियांचे हक्क, लिंगसमभाव हे विषय कायमच अग्रस्थानी राहिले आहेत.  देशात महिलांसाठी स्वतंत्र धोरण आखणारं पहिलं राज्य म्हणून महाराष्ट्र राज्याची ओळख आहे. याहीपुढे जावून महाराष्ट्रात एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरणाचा प्राथमिक मसुदा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, विकास अध्ययन केंद्र, कम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्ट आणि कोरो या संस्थांच्यावतीने राज्यातील अनेक संस्था आणि संघटनांच्या सहकार्याने तयार झाला आहे. एकल महिलांसाठी असं धोरण तयार करणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य आहे. 
    एकंदरीतच ‘स्त्री हक्क’ हा विषय महाराष्ट्रात सामाजिक चळवळींच्या केंद्रस्थानी राहिला आहे. त्यामुळे, काही प्रमाणात विविध क्षेत्रात महिला प्रगती करीत आहेत. असं असलं तरी स्त्री स्वातंत्र्य, स्त्री-पुरुष समानता, स्त्रीभ्रूण हत्या, स्त्रियांवरील वाढते कौटुंबिक हिंसाचार, बलात्काराच्या वाढत्या घटना, यामुळे स्त्रीवरील हिंसाचाराचं हे चक्र अजूनही संपलेलं नाही किंबहुना त्यात वाढ होताना दिसून येते. याहीपुढे जाऊन पाहिलं तर स्त्रियांवरील अत्याचाराचा प्रश्न इथेच संपत नाही, तर त्याची सुरुवात आपल्या समाजात मुलींना जन्म नाकारण्यापासूनच होते. परिणामी दरवर्षी मुलींचा जन्मदर घटत आहे. मुलींचा जन्मदर तथाकथित उच्च शिक्षित समजल्या जाणार्‍या वर्गात कमी दिसून येतो आहे. नुकतीच एका कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी झाले होते, तेव्हां तिथे उपस्थित असलेल्या काहीजणांनी किमान एक मुलगा असला पाहिजे. पहिली मुलगी असेल तर दुसर्‍या वेळी लिंग निदान करता आलं पाहिजे. दोन्ही मुली असतील तर आईवडिलांनी म्हातारपणी कसं जगायचं, अशा मुद्यांवर चर्चा सुरू होती. एकंदरीतच काय, तर शिकून कितीही प्रगती केली, आर्थिकदृष्ट्या सक्षम झालो तरी मानसिकता फारशी बदललेली दिसत नाही. 
    मुलगा-मुलगी जन्मदराबाबत फेब्रुवारी २०१८ मध्ये नीती आयोगाने  प्रकाशित केलेल्या अहवालानुसार १००० मुलांच्या जन्मामागे मुलींच्या जन्माचं प्रमाण २०१२-२०१४ या वर्षांत ८९६ आणि २०१३ ते २०१५ या काळात ८७८ इतकं आहे. नागरी नोंदणी अहवालानुसार २०१६ मध्ये हा दर १००० मुलांमागे ९०४ मुली असा होता. नीती आयोगाने २०१२ ते २०१४ या वर्षांतील जन्मदराची तुलना २०१३-२०१५ मधील जन्मदराशी केली असून त्यानुसार मुलीच्या जन्मदरात १७ राज्यात घट झाल्याचं दिसून आलं. त्यात महाराष्ट्राचा क्रमांक पाचवा आहे. मुलींचा जन्मदर कमी असलेली अन्य चार राज्यं गुजरात, राजस्थान, हरियाणा आणि उत्तराखंड ही आहेत.  त्याचप्रमाणे केंद्रीय आरोग्य विभागाने स्त्री-पुरुष जन्मदरासंबंधी नुकताच एक अहवाल जाहीर केला आहे. या अहवालानुसार १००० मुलांमागे मुलींच्या जन्मदराच्या प्रमाणात तफावत असून महाराष्ट्रातील जन्मदरातील तफावतही चिंताजनक आहे.
    सरकार ‘बेटी बचाव बेटी पढाव’चा नारा देत असलं किंवा ‘माझी कन्या भाग्यश्री’ म्हणत असलं, तरी मुलींच्या जन्मदरात होणारी घट हा चिंतेचा विषय आहे. देशाची आर्थिक राजधानी आणि सर्वार्थाने प्रगत म्हणून ओळख असलेल्या मुंबई शहरातही मुलीचा जन्म नाकारला जात आहे. तसंच मुंबईलगत असलेल्या शहरांमध्येही मुलीचा जन्म नाकारला जात आहे. याचं उदाहरण म्हणून पाहिलं तर ठाणे जिल्ह्यातील मुलींचा जन्मदर १००० मुलांमागे केवळ ७७० आहे. गेल्या काही वर्षांत मुलींच्या जन्मदराने एवढा निच्चांक कधीच गाठला नव्हता. २०११ च्या जनगणना अहवालात महाराष्ट्रातील ३५ जिल्ह्यांतील स्त्री-पुरुष जन्मदराची आकडेवारी जाहीर करण्यात आली होती. त्यातील धक्कादायक बाब म्हणजे राज्यात मुलींचा सर्वाधिक कमी जन्मदर मुंबई शहरात होता. हे प्रमाण मुंबईमधील सर्वाधिक उच्चभ्रू सोसायटीमध्ये दिसून आले. अशा शहरात एक हजार मुलांमागे मुलींचा जन्मदर फक्त ८३८ होता. मुंबई उपनगरात त्यावेळी हा आकडा ८५७ आणि ठाणे जिल्ह्यातील मुलींच्या जन्मदराचा आकडा ८८० होता. 
    मुलींच्या जन्माचं स्वागत व्हावं, मुलींना सन्मान मिळावा यासाठी राज्यात अनेक सामाजिक प्रबोधनाच्या चळवळी सुरू आहेत. सरकार मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी विविध योजना राबवत आहे. ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या केंद्र सरकारच्या योजनेचा मोठा गाजावाजा होताना दिसतो आहे.  स्त्री-भ्रूण हत्या रोखण्यासाठी केंद्र सरकारने गर्भलिंग चाचणी प्रतिबंधक कायदा (पीसीपीएनडीटी) अधिक कडक केला आहे. मुलींचा जन्मदर वाढवणं, मुलीच्या जन्माचं स्वागत-सन्मान करणं, जननी सुरक्षा योजना, माझी कन्या भाग्यश्री, सुकन्या ठेव योजना अशा अनेक योजना सरकारने जाहीर केल्या आहेत. सहा वर्षांपूर्वी बीड जिल्ह्यातील मुंडेदांपत्य प्रकरण उघडकीस आल्यानंतर पुरोगामी महाराष्ट्राची देशभर नाचक्की झाली. आज सहा वर्षं होत आली तरी या खटल्याचा निकाल लागला नाही. यानंतर राज्यभरात राजकीय आणि सामाजिक संस्थांनी ‘जागर जाणिवांचा, तुमच्या माझ्या लेकीचा’, ‘लेक वाचवा’ अभियानसारखे मुद्दे हाती घेऊन काम सुरू केलं आहे. त्यासाठी आपल्याकडे कायद्याचं बंधनही आहे, तरीही स्त्रीभ्रूण हत्यांसारख्या घटना होताना समोर येत आहेत. भरारी पथकांनी अनेक गर्भलिंग निदान केंद्रांवर छापे टाकून अटक करण्याच्या कारवाया केल्या आहेत. असं असलं तरीही मुलींच्या घटत्या जन्मदरासंदर्भातील अहवालाने शासनकर्त्यांपुढेच नव्हे, तर समस्त समाजापुढेही मोठं आव्हान उभं केलं आहे. 
    राज्यात स्त्री-भ्रूण हत्येला प्रतिबंध घालण्यासाठी कायद्याचा बडगा उगारायला सुरुवात केली आहे. राज्यात स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी शासनाने हेल्पलाईन आणि स्वतंत्र संकेतस्थळही सुरू केलं आहे. यावर प्राप्त झालेल्या तक्रारींमध्ये आत्तापर्यंत एकूण ४१७ केंद्रं संशयित आढळून आली आहेत. पीसीपीएनडीटी कायद्याच्या तरतुदीचा भंग करणार्‍यांविरुद्ध मे २०१८ अखेर ५८५ खटले दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी एकूण ९९ प्रकरणांमध्ये ११३ जणांना शिक्षा झाली आहे. १७ प्रकरणांमध्ये दंड ठोठावण्यात आला आहे. २०७ वैद्यकीय व्यावसायिकांची नांवं महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेला कळवण्यात आली आहेत. त्यापैकी ७२ डॉक्टरांची सनद निलंबित करण्यात आली आहे. ५८ डॉक्टरांना ताकीद देण्यात आली आहे. (दैनिक लोकसत्ता ६ जुलै १८)
    कायदेशीर कार्यवाही सुरू झाली असली तरी स्त्री अत्याचाराचा कोणताच प्रश्न हा केवळ कायदे आणि नियम करून सुटणार आहे का ? हा प्रश्न शिल्लक राहतो. शिक्षण आणि संधीमुळे होणार्‍या प्रगतीने मानवाच्या जीवनात सकारात्मक बदल होतात, असं म्हटलं जातं. अगदी मुंबई, ठाणे या शहरांच्या बाबतीत पाहायचं झालं, तरी राज्यातील इतर जिल्ह्यांपेक्षा माणसाला अधिक संधी, प्रगतीची द्वारं खुली आहेत, अशा ठिकाणी मुलींच्या जन्मदराचं प्रमाण कमी होणं आणि अगदी सर्वार्थाने सामाजिक-आर्थिक स्तरावर मागास असलेल्या चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांमध्ये मुलींचा जन्मदर जास्त आढळून येणं, ही स्थिती नेमकं काय सुचवते? मुलींचा जन्म नाकारणं, स्त्रियांवरील वाढती हिंसा आणि एकंदरीतच स्त्रियांच्या मानवी हक्काच्या घटनांचं विश्लेषण कसं करायचं? हा प्रश्न तसाच समोर राहतो. 
    स्त्री प्रश्नावर काम करत असताना विविध प्रशिक्षण, कार्यक्रम, सामाजिक उपक्रम यात सहभागी होण्याचा प्रसंग येतो. शासकीय स्तरावर स्त्री विषयक कायद्यासंबंधित आयोजित चर्चासत्रात जाण्याचा योग येतो. तेव्हा त्याठिकाणी होणारी चर्चा, दिली जाणारी उदाहरणं, व्यक्त होणारी मतं / विचार हे अधिक चिंताजनक आहेत. वर्ष २०१६ मध्ये केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्री मेनका गांधी यांनी जयपूर येथे एका कार्यक्रमात बोलत असताना गर्भलिंग निदान चाचणी अनिवार्य केली पाहिजे, असं जाहीर वक्तव्य केलं होतं.  प्रसारमाध्यमांमध्ये यावर जेव्हा गंभीर चर्चा झाली, तेव्हा हे माझं वैयक्तिक मत आहे, असं त्यांनी म्हटलं होतं. 
    पीसीपीएनडीटी या कायद्यावर आयोजित केलेल्या एका चर्चासत्रात मीही सहभागी झाले होते. त्याठिकाणी बर्‍याच वैद्यकीय अधिकार्‍यांची ओळख झाली. काहींनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून कामाची नवीनच सुरुवात केली होती. काहींनी काम सुरू करून बरीच वर्षं झाली होती. पीसीपीएनडीटी कायद्याबाबत त्यांच्या कामाचा अनुभव कसा आहे, हे जाणून घेत असताना त्यांनी या कायद्यामुळे त्यांच्या वैद्यकीय व्यवसायावर परिणाम झाला, अशी खंत व्यक्त केली. काहीजणांनी आत्ताच कुठे व्यवसायात जम बसत होता तर कायद्याच्या अंमलबाजवणीमुळे त्यातील माहितीची पूर्तता करताना त्रास होतो, ही भावना व्यक्त केली. दुसर्‍या प्रसंगात एका व्यक्तीने पहिली मुलगी असेल, तर दुसरा मुलगा असावा यासाठी गर्भलिंग निदान चाचणी का करू नये? असं मत व्यक्त केलं. किमान एक मुलगा असलाच पाहिजे, अशी त्यांची भूमिका होती. 
    स्त्री अत्याचाराच्या सगळ्या घटना पहिल्या तर आजही आपल्या समाजात स्त्रियांच्या प्रश्नाकडे मुळातच गांभीर्याने पाहिलं जात नाही. स्त्रीभ्रुण हत्या हा विषय इतका गंभीर आहे, की त्यावर खूप मोठ्या प्रमाणात काम होणं गरजेचं आहे. महाराष्ट्र नव्हे, तर देशभरात गाजलेले बीडचे सुदाम मुंडे आणि सरस्वती मुंडे हे प्रकरण आपण सर्वच जाणतो. 
    स्त्री भ्रूण हत्या, पीसीपीएनडीटी कायदा, लोकांची मानसिकता याचं सामाजिक विश्लेषण कसं करायचं किंवा कसं करावं हा प्रश्न सातत्याने पडतो. ‘फक्त कायदे करून स्त्री-पुरुष समानता येणार नाही. त्यासाठी लोकांची, समाजाची मानसिकता बदलायला हवी’, अशी त्यावर वरवरची विधानं केली जातात. परंतु, स्त्रियांना दुय्यम लेखण्याची, समजण्याची, गृहित धरण्याची  मानसिकता तयार होते कशी, त्यामागची पार्श्‍वभूमी काय आहे, याचाही भावनेच्या भोवर्‍यातून बाहेर येऊन विचार करण्याची गरज आहे. १९९४ साली केंद्र सरकारने मंजूर केलेल्या पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत दाखल झालेल्या खटल्यांचा निकाल सहा महिन्यांत लावावा, असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत. तरीही त्याची अंमलबाजवणी होताना दिसत नाही. त्यामुळे, त्याचा परिणाम अशा खटल्यांवर होतो. 
    आपल्या देशात कायदे आहेत. गुन्हेगार पकडला जाईल. त्याला न्यायालयाकडून शिक्षाही होईल. परंतु, जोपर्यंत मागास मानसिकतेतून आपण बाहेर येणार नाही. तोपर्यंत कळ्यांचे श्वास दाबले जातील; कधी मुंबई, कधी ठाणे तर कधी अन्य भरभराटीच्या शहरांतही! मुलींच्या जन्माची चिंता वाढवणारे अहवाल दरवर्षी जाहीर होत राहतील. या मागास आणि बुरसटलेल्या विचारसरणीवरच मुळात घाव घालावा लागेल. 

संदर्भ- 

1. https://mohfw.gov.in/sites/default/files/23Chapter.pdf

2. https://nrhm-mis.nic.in/SitePages/HMIS-PeriodicReport.aspx? RootFolder=%2FPart%20B%20Demographic%20and%20Vital%20Indicators%2FSRS%20BulletinsFolderCTID=0x012000F14E657-4E28DE48B36CCF7331E92DView=15C35C6-EC6-4336-C51-6F9CE331418

3. https://pcpndt.maharashtra.gov.in

~रेणुका कड

Responses

nike roshe run

Needed to create you that tiny note to give thanks once again for your breathtaking knowledge you've shared in this article. It has been certainly wonderfully open-handed with people like you to provide extensively all that a number of people could have advertised for an e-book to get some cash for themselves, especially considering that you might well have done it in case you wanted. These principles likewise worked like a fantastic way to be sure that some people have the identical fervor just like my very own to figure out a great deal more in terms of this matter. I'm sure there are lots of more pleasurable times ahead for people who see your site.

yeezy

I wish to voice my admiration for your kindness supporting women who must have help with this important concept. Your personal commitment to getting the solution all around was particularly beneficial and has frequently enabled regular people like me to arrive at their objectives. Your amazing useful help and advice can mean a whole lot to me and a whole lot more to my mates. Warm regards; from all of us.

jordan 12

I as well as my buddies were found to be following the good points from your web site and so unexpectedly came up with an awful suspicion I never thanked the website owner for those tips. All of the boys were definitely as a result very interested to read all of them and already have quite simply been tapping into these things. Appreciate your truly being quite kind and then for deciding on certain essential tips millions of individuals are really desperate to know about. Our own honest regret for not saying thanks to you earlier.

adidas stan smith

I'm commenting to let you be aware of what a really good experience my wife's girl had reading your site. She discovered such a lot of details, not to mention what it is like to have an ideal teaching character to let men and women really easily know specified extremely tough matters. You actually exceeded people's expected results. I appreciate you for rendering those precious, healthy, edifying and as well as cool tips about this topic to Emily.

yeezy boost 350

I and my guys have already been reading the nice ideas from your site and then got a terrible feeling I had not thanked the web site owner for those tips. Most of the ladies were definitely for that reason glad to learn all of them and already have in reality been loving these things. Appreciate your genuinely really considerate and also for picking out such good guides most people are really wanting to understand about. Our own sincere regret for not saying thanks to sooner.

yeezy shoes

My wife and i ended up being peaceful John could round up his web research from your ideas he made out of your blog. It's not at all simplistic to just choose to be handing out guides that many other people have been trying to sell. We really figure out we have got the website owner to thank because of that. The main illustrations you've made, the simple web site menu, the relationships you will make it possible to foster - it's everything astounding, and it is helping our son and us do think the concept is excellent, and that is really serious. Thank you for all the pieces!

michael kors factory outlet

I simply wanted to jot down a small note to say thanks to you for those fantastic advice you are writing on this website. My long internet look up has at the end of the day been recognized with excellent tips to write about with my friends and classmates. I 'd assume that we readers actually are very much endowed to exist in a good website with very many awesome professionals with great tips and hints. I feel very much happy to have used your web page and look forward to so many more brilliant times reading here. Thank you again for all the details.

goyard bags

My wife and i felt really glad Jordan managed to do his homework through the precious recommendations he obtained using your weblog. It's not at all simplistic to simply choose to be handing out concepts which often people may have been trying to sell. And we all do know we've got the writer to be grateful to for that. All the illustrations you have made, the easy blog menu, the relationships you can help create - it's most powerful, and it's facilitating our son and the family reason why that issue is fun, and that's unbelievably mandatory. Thanks for the whole thing!

bape hoodie

Thank you so much for providing individuals with such a marvellous opportunity to read from this site. It is always so fantastic and as well , jam-packed with fun for me personally and my office co-workers to visit your site at the least 3 times weekly to read through the latest stuff you will have. Not to mention, I'm just certainly fulfilled considering the tremendous strategies you give. Some 1 areas in this posting are easily the most effective I've had.

golden goose sneakers

Thanks for your entire effort on this blog. My aunt enjoys conducting investigations and it's easy to understand why. We all hear all concerning the powerful tactic you give very important solutions via your web blog and as well improve contribution from other people on the situation and our child is in fact starting to learn so much. Have fun with the remaining portion of the new year. You are always performing a remarkable job.

michael kors handbags

Thank you for each of your labor on this web site. My aunt takes pleasure in managing investigation and it's really simple to grasp why. My spouse and i hear all relating to the powerful form you create important guides by means of the website and foster participation from other people about this point while my child is truly learning so much. Take advantage of the remaining portion of the year. Your carrying out a splendid job.

Leave your comment