ती होती ललिता... हा आहे ललित! बीड जिल्ह्यातल्या माजलगांव तालुक्यातलं राजेगांव नावाचं एक छोटंसं गांव. या गांवाचं खास वैशिष्ट्य म्हणजे पंचक्रोशीत सुपरिचित असलेला बैलांचा बाजार. गांवातल्या बाजार- तळासमोरच मधुकर साळवे यांचं घर. त्यांना अनिता व ललिता अशा दोन मुली तर धम्मानंद व दयानंद ही दोन मुलं. त्यांच्याबरोबर बायको केशरबाई, असं त्यांचं कुटुंब. ललिता ही त्यांची दुसरी मुलगी. अत्यंत सोज्वळ पण, परखड स्वभावाची. लहानपणापासूनच गरीबीत जन्माला आली असल्याने सुरूवातीपासून ते महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत मामाच्या गांवी होती. अभ्यासासह अपार कष्ट करुन सरळ सेवा भरतीने २०१० साली बीडच्या पोलीस दलामध्ये महिला पोलीस शिपाई म्हणून रुजू झाली. गांवात या अगोदर कुणीही पोलीस दलामध्ये भरती झालं नसल्यानं अख्या गावानं ललिताचं कौतुक केलं. 
    लहानपणापासून ललिता इतर मुलींसारखीच मुलगी होती. बाकीच्या मुलींप्रमाणेच तिच्या सगळ्या सवयी असायच्या. गांवातल्या मुली ज्याप्रमाणे रहायच्या तसंच ललिताही संस्कारात वाढल्यानं अगदी चापून-चोपून रहायची. तिचं लाजणं, तिचं चालणं, तिचं बोलणं, हसणं, खेळणं हे सगळं अगदी गांवातल्या इतर मुलींसारखंच असायचं. ललिताच्या लहानपणीच राजेगांवात असलेली दीड एकर शेती तिची मोठी बहीण अनिताच्या लग्नासाठी विकावी लागली होती. मोठ्या बहिणीचं लग्न होऊन ती सासरी गेली. ललिता सुट्ट्यांमध्ये मामाच्या गांवाहून आपल्या घरी राजेगांवला यायची, तेव्हां उन्हाळ्याच्या व दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये बाजारच्या दिवशी घराच्या पुढें एक चहाची टपरी चालवायची. त्यातून मिळालेला पैसा हलाखीच्या परिस्थितीत त्या घराला हातभार लावण्यासाठी वडिलांना द्यायची. तिच्या आईला घरकामामध्ये मदत करायची. घरातलं, अंगणातलं सडासारवण-सगळं तिच्याकडेच असायचं. तीही हे सगळं आवडीने करायची. दुसर्‍याच्या शेतात आईसोबत मजुरीलाही जायची. तिला शिकण्याची खूप आवड होती.  मामाच्या गावी राहून तिने आपलं शिक्षण पूर्ण केलं. कधीही अगाऊपणा केला नाही किंवा कुणाच्याही डोळ्यावर येईल, असं कोणतंही कृत्य कधी केलं नाही. मामाच्या गावी शाळेत असताना तिला शिक्षणाबरोबरच इतर कामंही करावी लागायची. तिथेही ती आनंदानं घरातली सगळी कामं करायची. त्यामुळे, मामा-मामीलाही तिचा कधी कंटाळा आला नाही किंवा तिथे कुणालाही ती कधी नकोशी झाली नाही. लहानपणापासून मामाकडे शिकलेली ललिता  पदव परीक्षेला बसली अन् त्याच दरम्यान पोलीस भरतीची परीक्षा पास होऊन बीडच्या पोलीस दलामध्ये रुजूही झाली.
    नोकरी लागल्यानंतर, पगाराच्या पैशातून तिने दोन्ही भावांसाठी उत्पन्नाचं साधन म्हणून एकाला मोबाईल शॉपी टाकून दिली; तर दुसर्‍याला अ‍ॅप्पे रिक्षा घेऊन दिली. ललितासह दोन्ही भाऊ पैसा कमावू लागले. त्यामुळे, एकापाठोपाठ एक अशी दोघांचीही लग्नं घरच्यांनी लावून दिली. घरातील सर्व भावंडांची लग्नं झाल्यावर विनालग्नाची ललिता एकटीच राहीली. घरच्यांनी तिला तिच्या लग्नाबाबत विचारायला सुरवात केली. पण, ललिताने लग्नला नकार देऊ लागली. तिच्या आईनं खोलात जाऊन विचारल्यावर तिने तिच्या गुप्तांगाला गाठ असल्याचं सांगितलं. त्यासाठी बीडच्या एका खाजगी रुग्नालायात गेल्यावर तिथल्या डॉक्टरांनी पुढच्या उपचारासाठी मुंबईला जायला सांगितलं. त्याला खूप पैसा लागणार असल्याचंही सांगितलं. हे सगळं शक्य नसल्याने ललिता काही दिवस थांबली. नंतर २०१४ मध्ये ती मुंबईच्या जेजे रुग्णालयात गेली. तिथल्या डॉक्टरांनी तिच्या गुप्तांगाच्या गाठीची चिकीत्सा करुन, हार्मोन्सची तपासणी करुन तिला ती ‘स्त्री’ नसून ‘पुरूष’ असल्याचं सांगितलं. डॉक्टरांनी तसं सांगितल्यापासून लज्जेच्या कारणांमुळे तसंच आपण मुलगी नाहीत; पण आजपर्यंत मुलगी म्हणून जगलो, आता लोक काय म्हणतील या भितीने ही गोष्ट ती कुणाला सांगूही शकली नाही. आपण मुलगी नाही असं तिलाही वाटू लागलं. आपण मुलगा असून मुलगी म्हणून कसं जगलो? याविषयी ती विचार करू लागली. तिला स्वतःबद्दल अपराधीपणा वाटू लागला. खूप एकाकी पडत गेली. मनाने अगदी खचून गेली. जगावं की मरावं, असं तिला वाटू लागलं. अनेक वेळा आत्महत्या करण्याचा विचारही मनाला शिवून जायचा. पण, मनाने कणखर असलेल्या ललितामधल्या ‘ललित’ने तिला आत्महत्या करु दिली नाही. येणार्‍या सर्व अडचणींचा सामना करत हा भावनिक गुंता सोडवून ‘ललिता’चा ‘ललित’ होण्याचं तिनं ठरवलं. 
    ललिताने बीडच्या पोलिस अधिक्षकांकडे लिंगबदल करण्यासाठी परवानगी मागितली आणि त्यासाठी रजेचा अर्जही केला. पोलिस अधिक्षकांनी तिचा लिंग बदलाचा व रजेचा अर्ज पोलीस महासंचालकांकडे पाठवला. कारण, अशा प्रकारची मागणी यापूर्वी कुणीही केली नव्हती. ती महिला म्हणून भरती झाली असल्याने तिला भरतीच्या नियमानुसार नंतर पुरुष म्हणून नोकरीवर कामय ठेवता येणार नसल्याचं कारण सांगून पोलीस महासंचालकांनी तिचा अर्ज नाकारुन लिंग बदल करण्यास परवानगी दिली नाही. 
    मग ललिताने थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. नोकरीचा प्रश्न असल्यानं प्रकरण मॅटकडे सोपवण्यात आलं. तिने मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांनाही साकडं घातलं. मुख्यमंत्र्यांनी ललिताचं म्हणणं ऐकून सर्व परिस्थितीचा विचार करुन खास बाब म्हणून लिंग बदल करण्याची परवानगी दिली आणि पोलीस महासंचालकांनाही तसे आदेश दिले. पोलीस महासंचालकांनी मग बीडच्या पोलीस अधिक्षकांना आदेश देऊन ललिता साळवे यांना लिंग बदलाची लेखी परवानगी दिली. शिवाय, लिंग बदलानंतर पुरुष कर्मचारी म्हणून पोलीस दलात सामावून घेण्याचे लेखी पत्रही दिले. त्यानुसार २५ मे २०१८ रोजी मुंबईतल्या सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये ललिताची लिंगबदलाची शस्त्रक्रिया यशस्वी झाली. त्यानंतर ‘ललिता’चा ‘ललित’ होऊन १९ जून २०१८ रोजी आपल्या पहिल्याच जागेवर म्हणजेच माजलगांवच्या पोलीस स्टेशनमध्ये ‘पुरुष’ पोलीस कर्मचारी म्हणून तो रुजू झाला. 
    खरंतर, २०१४ पर्यंत ललिता ही मुलीसारखीच रहायची. २०१० साली पोलीस दलात रुजू झाल्यानंतर प्रशिक्षण सुरु झाल्यावर तिने तिचे लांबच्या लांब असलेले केस कापून बॉयकट ठेवायला सुरवात केली होती. त्यामुळे ती दिसायलाही पुरुषांप्रमाणे दिसायची. तिचं वागणं, बोलणं, चालणं, अगदी तिची देहबोली, हे सगळं पुरुषांसारखं असल्यानं, बसस्थानकातील किंवा सार्वजनिक ठिकाणच्या महिलांसाठी असलेल्या स्वच्छतागृहात गेल्यानंतर इतर महिला तिच्याकडे बघून लाजायच्या. त्यांना असं वाटायचं, की हा पुरुष असून, तो महिलांच्या स्वच्छतागृहात कसा आला? काही महिला तर तिच्याशी हुज्जत घालायच्या. इकडं कशाला, तिकडच्या स्वच्छतागृहात जा. म्हणून भांडायच्या. पण, समाजाच्या दृष्टीने ललिता ही महिला असल्याने पुरुषांच्या स्वच्छतागृहात जाऊ शकत नसायची. अशा एक ना अनेक गोष्टींमुळे ललिताचा दम कोंडायचा. या सगळ्या गोष्टी ती खुलेपणाने कुणाला सांगूही शकत नसायची. त्यामुळे, ती पुन्हा आतल्याआत अस्वस्थ होत राहायची. कोणीही तिच्याकडं एका ‘वेगळ्या नजरे’नं बघतंय, असं तिला नेहमी वाटत रहायचं. त्यामुळे तिची अस्वस्थता आणखी वाढायची. या सगळ्याला कंटाळून तिनं तिच्या आतून येणार्‍या आवाजाला होकार दिला, की तू ‘स्त्री’ नाहीस ‘पुरूष’ आहेस! तुला पुरूष म्हणून समाजामध्ये सन्मान मिळाला पाहीजे. यासाठी तुला झगडावं लागेल. कुणी कितीही नि् काहीही म्हटलं तरी चालेल; परंतु, तुला यातून मार्ग काढायचा आहे. असा मनात ठाम निश्चय करुन तिने होणार्‍या या त्रासाबद्दल, होणार्‍या घुसमटीबद्दल २०१४ पासून खुलेपणाने बोलायला सुरवात केली. ललिताने आता ‘ललिता’ नाही तर ‘ललित’ म्हणून जगणार असल्याचं ठामपणे सांगितलं. 
    कानातली सोन्याची फुलं काढून टाकली. पुरुषांप्रमाणे रहायला सुरूवात केली. सगळ्या गांवाने ललितचं नव्या जीवनामध्ये स्वागत केलं. पोरीचा पुनर्जन्म होऊन त्याचा पोरगा झाला म्हणून गांवकर्‍यांनी समंजसपणे आनंद व्यक्त केला. गांवातल्या प्रत्येकाने ललितला पुरुष म्हणून स्वीकारलंय. गांववाल्यांसाठी ‘ललिता दिदी’चा ‘ललितदादा’ झालाय. ललितच्या खात्यानेदेखील पुरुषांच्या प्रवर्गातून त्याची नोकरी कायम ठेवून पुरुष म्हणून स्वीकारलंय. शस्त्रक्रियेनंतर ललित आता नव्या आत्मविश्वासाने पुरुष म्हणून नोकरीवर रुजू झालाय. ललिताचा ललित होण्यापासूनच्या काळात साथ देणार्‍यांचे तसेच कोणताही आधार न देता हेटाळणी करणार्‍यांचेदेखील ललितने आभार मानलेत. 
    ललित म्हणतो, ‘मला असेही लोक भेटलेत ज्यांनी खूप त्रास दिला आणि असेही लोक भेटलेत, की ज्यांनी भरपूर पाठिंबा दिला. मला समजून घेतलं. माझ्या भावना, माझं दुःख अनेकांनी जाणलं आणि माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. त्यामध्ये मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससाहेब, मा. पोलिस महासंचालक सतीश माथुरसाहेब, पोलीस अधिक्षक जी. श्रीधरनसाहेब, माझे उजगरेमामा, माझे कुटुंबीय, माझे सर्व गांववाले, माझे सर्व पोलीस सहकारी, मीडियामधील काही पत्रकार ज्यांनी माझं दुःख समजून घेत माझा आवाज मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवला; तसंच कळत न कळत ज्यांनी ज्यांनी माझ्या ‘ललिता ते ललित’ या प्रवासात मला साथ दिली, त्या सर्वांचा मी आयुष्यभर ऋणी राहील. विशेषतः माझ्यावर माझ्या सुप्त पुरुषाच्या लिंगाबद्दल सर्व तपासण्या करुन मला पुरुष बनवलेल्या जे.जे. रुग्णालयातील सर्व डॉक्टरांचा! 
    ‘माझा घुसमटलेला श्वास, दबलेला आवाज मीडियानं उठवला आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवला. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी मला परवानगी दिली. पोलिस महासंचालकांनी म्हणजेच पोलिस खात्यानं माझा सहानुभूतीपूर्वक विचार केला. तसेच समाजानंही मला ‘पुरुष’ म्हणून स्वीकारलं, त्या सर्वांचा मी आभारी आहे. मला जे सहन करावं लागलं, तसं दुसर्‍यांच्या कुणाच्या बाबतीत होऊ नये. कारण, मी माझ्या आयुष्यात नरक यातना सहन केल्या आहेत. लहानपणीच माझ्या घरच्यांना कळलं असतं, की मुलगी नाही मी मुलगा आहे, तर या यातना मला सहन कराव्या लागल्या नसत्या. ललितापासून ललित होण्यासाठी मला जो संघर्ष करावा लागला, तो खूप यातनामय व भयानक होता. हा काळ माझं अस्तित्व सिध्द करण्यासाठीचा, माझ्या व्यक्तीस्वातंत्र्यासाठीचा स्वातंत्र्य लढाच म्हणावा लागेल. पण, या काळात मी ज्या वेदना सहन केल्या त्या कुणाच्याही नशिबी असू नयेत, असं मला मनापासून वाटतं.
    ‘मी सर्वांना आवाहन करतो, माझ्यासारख्या ज्या ‘ललिता’ असतील, त्यांना त्रास देऊ नका. त्यांना मदत करा. त्यांना मोकळं जगू द्या. त्यांच्या भावना समजून घ्या. समाजामध्ये कुणी ‘ललिता’ असतील, तर तुम्हीही घुसमटीचं आयुष्य जगू नका. पुढं या. सर्वच समाज वाईट नाही. तुम्हाला या समाजाची नक्कीच मदत होईल. आयुष्य सुंदर आहे, ते वाया घालवू नका.’
    ललिताने तिच्या लिंग बदलासाठी केलेल्या संघर्षाची ही कहाणी लिंगाविषयीच्या शारीरिक, भावनिक, मानसिक, सामाजिक तिढ्यामध्ये अडकलेल्या सर्वांना या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने प्रेरणादायी तशीच मार्गदर्शक ठरेल यात शंका नाही. लिंग बदल हा नाजूक, अत्यंत वैयक्तीक व संवेदनशील विषय आहे. त्यातून मुक्त होण्यासाठी ललिताने केलेला संघर्षही विसरता येणार नाही. लिंग बदलाकडे समाजानेही संवेदनशीलपणे पाहणे आवश्यक आहे. सर्व गोष्टी निसर्ग नियमानुसार चालत असतील, तर ललितासारख्या अनेकांना निसर्गतः वाटत असेल, की आपण ‘स्त्री’ नाही ‘पुरुष’ आहोत; तर त्याचं योग्य निदान करुन, त्यांच्या भावना समजून घेऊन, त्यांना जगण्याचं स्वातंत्र्य दिलं पाहिजे. 

~अशोक आबुज

Responses

Women May Sneakers

Thanks for all your valuable hard work on this blog. Betty takes pleasure in participating in investigation and it is obvious why. We know all of the compelling method you render invaluable guides via this web site and even improve contribution from other ones on that point plus our simple princess is in fact becoming educated a whole lot. Take advantage of the rest of the new year. You're conducting a great job.

birkin bag

I have to voice my admiration for your kindness for those people who absolutely need help on your theme. Your special commitment to getting the solution around turned out to be definitely powerful and have truly allowed ladies much like me to arrive at their dreams. Your important hints and tips means this much a person like me and much more to my office colleagues. Thanks a ton; from all of us.

balenciaga

I have to show my passion for your kind-heartedness giving support to those individuals that need help with the idea. Your very own dedication to getting the message along became quite invaluable and have specifically made many people just like me to achieve their goals. Your amazing invaluable tutorial entails much to me and still more to my fellow workers. Thanks a lot; from each one of us.

golden goose sneakers

I wanted to put you that little observation to finally thank you so much as before with the beautiful strategies you've provided on this website. This is really incredibly open-handed of people like you to convey publicly what exactly many of us would've offered for sale for an e-book to generate some cash for themselves, primarily seeing that you could possibly have done it if you ever wanted. The good tips in addition worked to become a great way to recognize that most people have similar passion just as my very own to figure out somewhat more in terms of this condition. I am sure there are several more enjoyable opportunities up front for folks who scan your site.

louboutin shoes

Thank you so much for giving everyone an extraordinarily wonderful opportunity to discover important secrets from here. It is usually so useful plus full of amusement for me and my office co-workers to visit your site on the least thrice every week to read through the fresh issues you have. And definitely, we are usually fascinated with the perfect creative ideas you give. Certain 1 facts in this article are particularly the simplest we have had.

kyrie 3

Thank you for all of the efforts on this website. Debby takes pleasure in working on investigations and it's easy to understand why. Most of us learn all about the lively way you present priceless secrets through your web site and therefore increase contribution from the others about this area then my girl is certainly becoming educated a lot of things. Have fun with the rest of the new year. You're carrying out a wonderful job.

off white

I am only writing to make you know of the terrific discovery my daughter had visiting your webblog. She realized lots of things, which included what it's like to possess an ideal coaching mindset to make other people effortlessly thoroughly grasp specific specialized things. You truly surpassed readers' desires. Thank you for imparting the productive, healthy, informative and also cool thoughts on your topic to Lizeth.

links of london outlet store

I want to show my thanks to the writer for rescuing me from this particular problem. Just after scouting through the online world and getting notions that were not beneficial, I thought my entire life was over. Existing minus the answers to the difficulties you have resolved by way of your good article content is a serious case, as well as the kind that would have in a wrong way affected my entire career if I had not noticed your web page. Your primary training and kindness in controlling all the pieces was crucial. I am not sure what I would have done if I had not come across such a solution like this. I can now relish my future. Thanks so much for your professional and results-oriented guide. I will not think twice to suggest your blog post to anybody who would need counselling on this issue.

ferragamo belts

I precisely desired to say thanks yet again. I'm not certain the things that I might have tried in the absence of the actual tips contributed by you directly on my problem. It truly was a fearsome crisis in my position, but spending time with this expert tactic you dealt with it made me to cry with contentment. Now i am happier for this advice as well as trust you are aware of a powerful job that you're providing instructing men and women via your web page. I know that you have never got to know all of us.

moncler jackets

I am commenting to let you understand what a great encounter my friend's princess undergone going through your webblog. She learned some issues, most notably what it is like to have an excellent giving style to let folks quite simply fully grasp various complex things. You undoubtedly did more than our expectations. Thank you for supplying the warm and helpful, safe, explanatory as well as fun guidance on this topic to Sandra.

moncler jackets

I really wanted to write down a simple word in order to say thanks to you for all of the splendid ideas you are giving out at this website. My time intensive internet look up has at the end been paid with incredibly good suggestions to talk about with my best friends. I would suppose that many of us site visitors are truly lucky to live in a decent community with very many lovely professionals with very helpful methods. I feel very fortunate to have used your entire weblog and look forward to really more exciting minutes reading here. Thank you once again for all the details.

adidas ultra boost

My spouse and i felt very comfortable that Edward managed to round up his reports via the precious recommendations he came across in your web pages. It's not at all simplistic to simply always be giving away instructions that others might have been selling. And we figure out we now have you to give thanks to for that. The type of illustrations you made, the easy website navigation, the relationships you help create - it is everything unbelievable, and it's really aiding our son in addition to the family believe that that issue is awesome, which is highly serious. Many thanks for the whole thing!

nike vapormax

I would like to voice my appreciation for your kindness supporting folks that actually need guidance on your situation. Your personal commitment to passing the message around came to be amazingly invaluable and has frequently encouraged some individuals like me to reach their desired goals. Your amazing helpful information signifies this much to me and much more to my colleagues. With thanks; from everyone of us.

Leave your comment