बॅॅकसीट बॅकसीट... प्रत्येक गाडीला असतेच... त्यात काय विशेष ?
आता जरा लक्ष द्या... 
आपल्या गाडीची बॅकसीट नजरेसमोर आणा... 
आठवा बरं, कोण-कोण बसतं तुमच्या बॅकसीटवर?
ताई, दादा, आई, बाबा, मित्र-मैत्रिणी इत्यादी.
तुम्ही एक स्टेटस वाचलं असेल...
With Mom - 20 km/hr...
With Friends - 80 km/hr
Alone 120+... झिंगाट
तुम्ही आईला बॅकसीटवर घेऊन कधीच कट मारत नाही जाणार... 
तेच जर सोबत मित्र असतील तर फुल्ल मस्ती...
तेच जर कोणी खास असेल तर साधा खडासुद्धा लागू देत नाहीत ...
अन् एकटे असल्यावर तर वार्‍यावर स्वार...
बघा, ड्रायव्हर तुम्हीच पण तुमची बॅकसीट ठरवते तुम्ही गाडी कशी चालवणार ते... 
आहे की नाही गंमत?
आयुष्यपण असंच असतं.
बघा हं...
    तुमची गाडी म्हणजे तुमचं आयुष्य, तिचे ड्रायव्हर अर्थात तुम्ही स्वतः आणि तुमच्यावर जीव टाकणारी व तुमच्यावर अवलंबून असणारी माणसं हीच तुमची बॅकसीट... यामध्ये तुमचे आई-बाबा, ताई-दादा, नवरा/बायको-मुलं असे सर्व.
    तुम्ही एक जरी योग्य किंवा चुकीचा निर्णय घेतला, तर त्याचा आनंद किंवा त्रास हा तुमच्या बॅकसीटला १००% होणार म्हणजे होणारच... तुमची व्यसनं, चुकीचे मित्र तुमच्या बॅकसीटला चारचौघात मान खाली घालायला लावतात... तेच जर तुम्ही एखादं चांगलं काम केलंत, तर तुमच्या बॅकसीटच्या आनंदाला पारावार उरत नाही.
    अहो, अपघाताला ड्रायव्हरच जबाबदार असतो हो. पण बॅकसीटवरचे मात्र फुकटच जखमी होतात. लक्षात येतंय ना?
    आता तुमच्या आयुष्याच्या गाडीचं बॅकसीट पहा आणि पोहोचण्यासाठी एक छानसं ठिकाण ठरवा. चांगले मित्र-मैत्रीण निवडा. मग बघा, कसे अगदी सुखरुप पोहोचाल.

एकच विनंती - तुम्हाला तुमच्या आयुष्याच्या गाडीला टर्न द्यायचा असेल, यु-टर्न द्यायचा असेल किंवा अगदी स्टंटच करावा वाटत असेल, तेव्हा किमान एकदा तरी आपल्या बॅकसीटचा विचार करुन मगच काय करायचं ते ठरवा...

~साभार- सोशल मीडिया

Leave your comment