सामूहिक वनहक्क कार्यशाळा    गेल्या २६ मार्च रोजी राजूर येथे सामूहिक वनहक्कांविषयी तालुकास्तरीय कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेस अकोले तालुक्यातील सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते.
    वनहक्क कायद्याने लोकांचे वैयक्तिक, सामूहिक व विकास कामासाठीचे वनहक्क मान्य केलेले आहेत. मात्र, आजही त्यांची प्रभावी अंमलबजावणी देशभरात होत नाही. महाराष्ट्रातील स्थितीही फारशी आशाजनक नाही. साधारण दाखल दाव्यांपैकी ३२ टक्केच दावे मंजूर झालेले आहेत. नवीन दावे दाखल करण्याची प्रक्रिया ही जवळपास ठप्प आहे. अकोले तालुक्यात अजून बर्‍याच गांवांचे सामूहिक वनहक्क दावे दाखल होणे बाकी आहेत. यासाठीच लोकपंचायतने सामूहिक वनहक्क दावे दाखल करण्याविषयी तालुकास्तरीय कार्यशाळेचे आयोजन केले होते.
    कार्यशाळेत लोकपंचायतच्या आदिवासी हक्क प्रकल्पाचे समन्वयक हनुमंत उबाळे यांनी वनहक्क कायद्याविषयी माहिती दिली. संस्थेचे किशोर सोनवणे, साहेबराव भारमल यांनी सामूहिक वनहक्क दावा कसा तयार करायचा, याची प्रक्रिया उपस्थितांना समजून सांगितली.
    आम्ही आमच्या गांवातील सामूहिक वनहक्काचा दावा तयार करण्यास सुरूवात करणार असल्याचे उपस्थित सर्वच गांवच्या सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थ यांनी सांगितले.
    कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी नंदा बांडे, सयाजी आसवले, राहुल मैड, त्रिंबक धराडे, वाळीबा भौरूले, सरिता सावंत, भाऊराव उघडे यांनी विशेष प्रयत्न केले.

~संस्था वृत्त

Leave your comment