विभागीय स्तरावर प्रथम क्रमांक    औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षणार्थ्यांमध्ये कौशल्य, शोध व नवनिर्मिती हे गुण वाढीस लावून त्यांच्या बुद्धीस चालना मिळणे व निकोप स्पर्धा वाढीस लागावी यासाठी तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे अहमदनगरच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ‘जिल्हास्तरीय तंत्रप्रदर्शना’चे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनामध्ये ‘लोकपंचायत ग्रामीण तंत्रशिक्षण संस्थे’च्या ‘इमर्जन्सी पंप’ या प्रकल्पाला इंनोव्हेटीव कॅटेगिरीतून प्रथम क्रमांक मिळाला होता. यानंतर प्रकल्पाची विभागीय स्तरावर निवड झाली होती. 
    ‘विभागीय तंत्र प्रदर्शन’ धुळे जिल्ह्याच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आयोजित करण्यात आले होते. विभागीय स्तरावरतीही या प्रकल्पाला इंनोव्हेटीव कॅटेगिरीतून प्रथम क्रमांक मिळाला. 
    प्रकल्प तयार करण्यासाठी एम.एम.व्ही. ट्रेडच्या शुभम देशमुख, गणेश शेळके, अभिषेक शेळके, आदेश तळपे या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन प्रकल्प यशस्वी केला. त्यांना निदेशक सतीश सावंत यांनी बहुमोल मार्गदर्शन केले. तसेच संस्थेचे विश्वस्त उल्हास पाटील, व्यवस्थापक रमेश शेटे, प्राचार्य प्रशांत सहाणे यांच्यासह सर्व शिक्षक व कर्मचारी यांचेही विशेष सहकार्य लाभले. या उपलब्धीबद्दल समाजाच्या विविध स्तरातून संस्थेचे अभिनंदन केले जात आहे. 

~संस्था वृत्त

Leave your comment